Share

एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून

Published On: 

🕒 1 min read

सातारा:- जावळी-सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदेच्या रूपानं तिथं पुन्हा एकदा ताकद उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून आता शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदे असा सामना रंगला आहे. शिवेंद्रराजे यांनी विरोधकांना संपवण्याची भाषा केल्यामुळं या वादाला अधिकच धार चढली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्याशिवाय गप्प बसत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते.

मात्र, आज साताऱ्यातील एका लग्नसमारंभात शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे एकत्र दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्यात कोणताच वाद नाही अशा आविर्भावात हे दोन्ही नेते एकमेकांच्या बाजूला बसले होते. या अनपेक्षित चित्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!