Share

डिजिटल पेमेंट युजर्स साठी महत्वाचे ‘हे’ पेमेंट अॅप होतेय बंद !

Published On: 

नवी दिल्लीः देशात नोटबंदीनंतर लोकांनी कॅश नसल्याने या अॅप्सवर सर्वात जास्त पेमेंट केले आहे. तर गेल्या वर्षभरात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लोकांचे डिजिटल व्यवहार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट अॅप्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता देशात डिजिटल पेमेंट युजर्स लागोपाठ वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आली आहे. नुकतीच देशातील एक डिजिटल पेमेंट अॅपने भारतातील आपली सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही या अॅपचा वापर करीत असाल तर लवकर आपले पैसे यातून काढून घ्या. तसेच आपले अकाउंट डिअॅक्टिव करणे, हे चांगले आहे.

मीडिया सोर्सच्या माहितीनुसार, डिजिटल पेमेंट अॅप ‘पे पल’ या अॅपची सेवा १ एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी ‘पे पल’ चा वापर सुरू राहणार आहे. जर तुम्ही पे पलचा वापर करीत असाल तर आपल्या अकाउंटला डिअॅक्टिव करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुम्ही ‘पे पल’ च्या वेबसाइटवर जा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाउंट ऑप्शनमध्ये जा. यानंतर आपल्या बँकच्या अकाउंट नंबर टाका. त्यानंतर नवीन पेजवर जाऊन क्लोज अकाउंटवर क्लिक करा. जर तुमचे अकाउंट अशाप्रकारे बंद होणार नसेल तर तुम्ही ईमेल वरूनही या अकाउंटला बंद करू शकता.

‘पे पल’ जगभरात जवळपास १९० देशात आपली सर्विस देते. या देशात जवळपास १०० मिलियन अकाउंट मेंबर आहेत. भारतात ‘पे पल’ ने २०१७ मध्ये आपली सेवा सुरू केली होती. डिजिटल पेमेंट ही एक वेबसाइट आहे. ज्यावरून ऑनलाइन पेमेंट केली जाते. तर याच्या मदतीने अनेक युजर्सं आंतरराष्ट्रीय लेवलवर ट्रान्झॅक्शन करू शकता. ‘पे पल’ च्या मदतीने युजर्स एका देशातून दुसऱ्या देशात सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!