🕒 1 min read
सिंधुदुर्ग:- भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार असून शहा सिंधुदुर्गात येऊन काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.
आज दुपारी 2 वाजता अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या लाईफटाइम मेडिकल कॉलेजचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आज दुपारी बरोबर 1.50 वाजता शहा हे गोवा येथे पोहोचतील. तिथून हेलिकॉप्टरने ते पडवे-कसाल येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज परिसरात येतील. या सोहळ्या निमित्ताने शहा तब्बल दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत. कार्यक्रमानंतर ते राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतील.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या प्रदेशात जातात तो प्रदेश शतप्रतिशत भाजपमय होतो. राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभ संकेत आहेत. लवकरच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पहायला मिळेल, असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे. सर्वच विकासकामांच्या बाबतीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडी पक्षाची मंडळी एकमेकांना खो देण्याचे काम करत असल्याने राज्यातील शिवसेना पक्षाचे आमदार कंटाळले आहेत. कॉंग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार तर आधीच बॅकफुटवर गेले आहेत. याखेरीज राष्ट्रवादीचे मंत्री सत्तेचा गैरफायदा उठवत असल्याने मुख्यमंत्र्यांनीही फायलींवर स्वाक्षरी करणे बंद केले आहे. या साऱ्यांत नोकरशहा मंडळीही सरकारच्या कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच सत्तांतर होईल आणि भाजपचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असे जठार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘रूट को जड़ से उखाड़ देंगे ! अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफने दिले भन्नाट उत्तर !
- परळी शहरात दहा लाखांची चोरी; काही दिवस आधिच आयजींकडून झाला आढावा
- ‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय’
- विजय हजारे ट्रॉफीला येत्या २० फेब्रुवारीपासून होणार सुरुवात
- आरटीओंची धडक मोहीम; खासगी बसेसवर केली कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
