🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७५ वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली. मात्र यानंतर सचिनसह अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. शेतकरी आंदोलनाबाबत इतक्या दिवसांपासून शांत बसलेला सचिन रिहाना व ग्रेटाच्या ट्विटनंतर जागा झाल्याने नेटकरी चांगलेच भडकलेत.
सेलिब्रिटींच्या या पवित्र्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे. ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो शेतकऱ्याला देशद्रोही ठरविताना जरा भान ठेवा. तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने आहेत हे विसरू नका, नाहीतर तुमचं तुणतुणं बंद पडेल’ असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.
सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो शेतकऱ्याला देशद्रोही ठरविताना जरा भान ठेवा. तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकर्यांच्याच बाजूने आहेत हे विसरू नका, नाहीतर तुमचं तुणतुणं बंद पडेल!!@ANI@narendramodi @sachin_rt
— Raju Shetti (@rajushetti) February 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल बोलणार, किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’?
- परळी शहरात दहा लाखांची चोरी; काही दिवस आधिच आयजींकडून झाला आढावा
- ‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय’
- विजय हजारे ट्रॉफीला येत्या २० फेब्रुवारीपासून होणार सुरुवात
- आरटीओंची धडक मोहीम; खासगी बसेसवर केली कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
