🕒 1 min read
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळाला 6 फेब्रुवारी सुरुवात झाली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रुट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मागील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने द्विशतकी आणि दीडशतकी खेळी केली होती. शुक्रवारपासून (०५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर त्याने शतक पूर्ण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवातही धडाकेबाज फलंदाजीने करत त्याने द्विशतक झळकावले.
जो रूटचे विक्रमी द्विशतक इंग्लंडचा डावाचे वैशिष्ट्य ठरले. रूटच्या या खेळीचे कौतुक इंग्लंड संघ थांबलेल्या हॉटेल व्यवस्थापनाने देखील अनोख्या पद्धतीने केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, इंग्लंड संघ ज्यावेळी हॉटेलमध्ये दाखल झाला, तेव्हा हॉटेल व्यवस्थापनाने त्यांचे जंगी स्वागत केले. शानदार द्विशतक झळकावणाऱ्या रूटचे कौतुक म्हणून हॉटेल व्यवस्थापनाने खास केक मागविला होता. त्यांनी हा केक रूटला कापण्यास सांगितले. यादरम्यान हॉटेल कर्मचारी व इंग्लंड संघातील खेळाडूंनी टाळ्या वाजवत रूटचे अभिनंदन केले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Indian hospitality for @root66 – thank you ????????????
Day 2 Highlights: https://t.co/9G6YJG1Unx #INDvENG pic.twitter.com/5eHk1EzoF2
— England Cricket (@englandcricket) February 6, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेना जोमात अन भाजप कोमात’ ; भाजपचा ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
- राज्य शासनाचे अनुदान बंद, औद्योगिक वीज ग्राहकांना बसणार बिलवाढीचा शॉक
- ‘खतविक्रीची नोंद ई-पॉसवर वेळेत करून घ्या’, कृषी अधिकाऱ्यांचे विक्रेत्यांना निर्देश
- शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं : राज ठाकरे
- …अन् ‘हुतुतू-हुतुतू’ खेळू लागले जिल्हा परिषदेचे कर्मचारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
