Share

कृषी कायदे मागे घ्या…अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल : बच्चू कडू

Published On: 

🕒 1 min read

वर्धा: कृषी कायद्यावरून संसदेत जोरदार रणकंदन सुरू असतानाच आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे. कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी याबाबत माहिती दिली होती. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू बोलत होते, “आज संपूर्ण देशात शेतकऱ्यांच आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे असच दुर्लक्ष केलं तर उद्रेक होईल, आंदोलनाला दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला आहे. हे आंदोलन देशातल सर्वात मोठं आणि सर्वात जास्त संख्येत असलेलं आंदोलन आहे.

मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे हे चुकिच आहे. कायदा मागे घेतल्यावर नुकसान काय होईल, कोणाच्या तिजोऱ्या कमी होतील हे मोदींनी स्पष्ट करावं. कायदे मागे घेतल्यान शेतकऱ्यांच काहीच नुकसान होणार नाही तर होणार कोणाचं नुकसान हे स्पष्ट करावं. नुकसान काहीच होत नसेल तर कायदा मागे घ्यायला अडचण काय आहे हा ही प्रश्न आहे.

मला असं वाटत की सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये , आपण त्या शेतकऱ्यांच्या मतदानावर भूलथापा देऊन दोन वेळा निवडून आले आहे, अस आता चालणार नाहीय. असच चालू राहील तर त्याचा उद्रेक होईल,” अशी प्रतिक्रिया दिलीय.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!