औरंगाबाद : क्रांती चौकातील रस्त्यावरून जातांना दुचाकीस्वार तरूणी खाली पडली. आणि नेमके त्याचवेळी मागून येणाऱ्या स्मार्ट सिटी बसच्या खाली तरुणी येणार तोच चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ब्रेक लावल्याने दुचाकीवरून खाली पडलेल्या या तरुणीचा जीव वाचला. या घटनेने पुन्हा एकदा स्मार्ट सिटी बस चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर तरुणी सोमवारी (दि.१) शासकीय दूध डेअरी चौकाकडून शहरात जात होती. क्रांतीचौकात दुचाकीवरून रस्ता ओलांडताना खराब रस्त्यामुळे व मधेच असलेल्या खड्ड्यामुळे अचानक दुचाकीसह तरूणी पडली. याच वेळी तिच्या मागून स्मार्ट सिटी बस येत होती. तरूणी रस्त्यावर पडल्याचे दिसताच चालकाने प्रसंगावधानता राखून बसला ब्रेक लावला. दुचाकी अर्धवट बसच्या खाली आली होती. तरूणीला इजा होणार नाही याची संपूर्ण काळजी बसचालकाने घेऊन बस नियंत्रणात आणली.
दोन वर्षांच्या कालावधीत स्मार्ट सिटी बसने अपघातमुक्त सेवा दिली आहे. प्रवाशांना सुरक्षा देऊन एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. राज्य वाहतुक चालकांच्या अनेक वर्षांच्या अनुभवामुळे स्मार्ट सिटी बस सेवा अपघातमुक्त राखण्यात मौलाची भर पडली आहे. स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक प्रशांत भुसारी म्हणाले की, ‘स्मार्ट सिटी बस सर्व्हिसचे उद्दिष्ट शुन्य अपघाताची नोंद आहे. बस चालविताना रस्त्यावरच्या इतर वाहन चालकांच्या सुरक्षेची जाणीव ठेवण्याची बस चालकांची जबाबदारी आहे. या प्रसंगामुळे ही जबाबदारी स्मार्ट सिटी बसचालक पाळत असल्याचे दिसून येते. या घटनेची दखल घेऊन आणि सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा माहच्या अनुषंगाने एएससीडीसीए व्यवस्थापनाने बस चालकाचा सत्कार करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सारथी’चं आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता’ ; सरकारने फसवणूक केल्याचा आरोप
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
