पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथीचं आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं ‘सारथी’ साठी ८० कोटी रुपयांची घोषणा केली होती. पण १८ जानेवारीला सारथीला फक्त २५ टक्केच निधी मिळाला आहे. तर एकूण १३० कोटी रुपयांपैकी अवघे ३१ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं सारथीला ठेंगा दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय.
त्यामुळे राज्य सरकारनं सारथीला ठेंगा दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान बुधवारी सकाळी ११ वाजता सारथी संस्थेत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. तारादूतांच्या नियुक्ती प्रश्नावरही या बैठकीत चर्चा होईल. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी राज्यभरातून तारादूत पुण्यातील सारथीच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. महत्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सारथी संस्थेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला होता.
बुधवारी होणाऱ्या सारथी संस्थेच्या बैठकीत प्रश्न सुटला नाही तर तारादूत १५ तारखेला तीव्र आंदोलन करणार आहेत. तर १९ तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा तारादूतांकडून देण्यात आलाय. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सारथीच्या बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सारथीचं आंदोलन पुन्हा पेटण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींना नवाब शरीफांची भेट घ्यायला परवानगी लागत नाही, मग आम्हाला शेतकऱ्यांची भेट घ्यायला परवानगी लागते का ?’
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
