🕒 1 min read
मुंबई: केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाला राज्यातून पाठींबा देण्यात येत असून शिवसेनेने देखील वेळोवेळी शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना आज भेटणार असल्याची माहिती दिली आहे. ‘महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे’ असे यामध्ये राऊत
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत.@OfficeofUT @PawarSpeaks @AUThackeray
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
शिवसेनेने पहिल्यापासूनच मोदी सरकारवर शेतकरी आंदोलनावरून निशाणा साधला आहे. त्यांनतर आता संजय राऊत शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी थेट दिल्लीच्या सीमेवर जाणार आहे. आज दुपारी 1 वाजता दिल्ली शहराच्या सीमेवरील गाझीपुर परिसरातआंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेतील. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेवरून संजय राऊत आंदोलनकर्ते शेतकर्यांची भेट घेणार असल्याच त्यांनी सांगीतल. सध्या २६ जानेवारीच्या आंदोलनातील हिंसाचार नंतर सिंघू सीमेवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ताळमेळ नसलेला अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे होमवर्कचा अभाव : अशोक चव्हाण
- २३ वर्षीय नंदिनी सलोखे ठरली महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’
- रामदेवबाबांकडून अर्थसंकल्पाच कौतुक ! पतंजलीकडून पाच लाख तरुणांना मिळणार रोजगार…
- पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांचे रवी शास्त्रींबद्दल मोठे वक्तव्य
- लातूर जिल्ह्यासाठी ४६ कोटी मंजूर; विकासकामाना गती देण्याचा पालकमंत्र्याचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
