नांदेड : काही दिवसापूर्वी एक शाळकरी मुलाचा पाढे म्हणताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा विद्यार्थी कोणताही ताळमेळ नसणारे पाढे म्हणत असतो. हा पाढे म्हणणारा विद्यार्थी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या दोघांची तुलना करत दोघांकडेही होमवर्कचा अभाव असला तरी आवेश मात्र अफलातून असे टि्वट करुन खरमरीत टिका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पातुन काहितरी भरीव पुढे येईल असे वाटले होते. पण या सर्व अपेक्षावंर पाणी फेरत केंद्र सरकारने दिशाहिन अर्थसंकल्प मांडून कोरोना आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांची, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि उद्योजकांची आणखी पिळवणूक करण्याचे काम केले आहे. असे अशोक चव्हाण सांगितले.
आयकरात कोणताही बदल न झाल्यामुळे मध्यमवर्गीय नाराज आहेत. कृषीक्षेत्रामध्ये केलेली वाढ म्हणजे शेकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणार असे ते म्हणाले. पेट्रोल डिझेलचे भाव हे विक्रमी उच्चाकांवर गेले आहेत, या दरवाढीसाठी अतंरराष्ट्रीय तेल बाजाराच्या किमती कारणीभूत नसुन केंद्र सरकारने लावलेले कर आहेत. एकूण अपेक्षांभग करणारा हा अर्थसंकल्प आहे असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- “भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘अर्थसंकल्पाच्या ‘कागदी घोडय़ां’चे ‘डिजिटल घोडे’ झाले एवढाच काय तो फरक’
- नांददेडमध्ये रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी लवकरच सुरू करणार क्रिकेट अकादमी
- ‘अर्थकारणातही ‘स्वप्नरंजन’ आणि राजकारण आणणारा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प
- ‘हिंदू समाज सडका झालाय’ अस म्हणणाऱ्या शरजिल उस्मानी विरोधात पुण्यात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
