Share

उद्या केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णा हजारेंची भेट घेणार; गिरीश महाजनांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. मात्र, हजारे आंदोलन करण्यावर ठाम आहेत. यातून केंद्र सरकार आणि भाजपपुढील अडचणी वाढल्याचे दिसून येते.

दरम्यान, आज भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले आहेत. याअगोदरही दोनदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.

गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यातली बैठक संपली आहे. अण्णांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री सोबत बैठक झाली असून काही निर्णय घेण्यात आले आहे. कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या निर्णयाचे पत्र गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. अण्णांनी आंदोलन करु नये अशी विनंती महाजन यांनी अण्णांना केली. उद्या (शुक्रवार) केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!