Share

शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मदतीचा हात !

Published On: 

मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे निगवे गावचे सुपुत्र शहीद संग्राम पाटील आणि बहिरेवाडी गावचे सुपुत्र शहीद ऋषिकेश जोंधळे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शहीद संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या बहिरे गावचे सुपुत्र हृषिकेश जोंधळे आणि करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील यांना सिमेवर रक्षण करताना वीरमरण आले. हृषिकेश जोंधळे यांचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहतात. तर संग्राम पाटील यांना दोन मुले असून, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत.

यापैकी हृषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना पक्क घर बांधून देण्याचा शब्द पाटील यांनी दिला होता. तर संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी दोन्ही कुटुंबांना मदत करत चंद्रकांत पाटील यांनी आपला शब्द पूर्ण केला.

प्रजासत्ताक दिनी जोंधळे कुटुंबियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पक्क्या घराचे भूमीपूजन तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. तर संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांच्या निधी संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला. या निधीचा धनादेश माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पाटील कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!