अहमदनगर:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. मात्र, हजारे आंदोलन करण्यावर ठाम आहेत. यातून केंद्र सरकार आणि भाजपपुढील अडचणी वाढल्याचे दिसून येते.
दरम्यान, आज भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले आहेत. याअगोदरही दोनदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.
गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यातली बैठक संपली आहे. अण्णांनी आंदोलन करु नये अशी विनंती महाजन यांनी अण्णांना केली आहे. उद्या (शुक्रवार) केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर रक्षा खडसे यांचे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला : देशमुख
- रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकित
- मोहम्मद शमीने वडिलांच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला.
- विराट-रोहितचा दबदबा कायम; विराट नंबर वन वर तर रोहित.
- शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मदतीचा हात !


