🕒 1 min read
दिल्ली : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यानंतर, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांचे नियम धाब्यावर बसवत दिल्लीतील इतर भागात प्रवेश केला. यावेळी त्यांना रोखताना पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची देखील झाली.
आंदोलकांनी बस, पोलीस वाहने यांचे नुकसान करत पोलिसांवरच ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. तर, लाल किला देखील शेतकऱ्यांनी काबीज केला. हे सर्व प्रकरण हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच शेतकरी नेत्यांनी हे आंदोलक आपले नसून शेतकऱ्यांनी मुख्य आंदोलन स्थळी परतावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
यावरून भाजप नेते आंदोलन करणाऱ्यांवर टीका करत असतानाचा शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी, ‘शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे,’ असा आरोप केला आहे. शेतकरी नेते अशोक ढवळे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, ‘मी स्वतः आता दिल्लीमध्ये आहे. शहाजहांपूर सीमेवरुन जी ट्रॅक्टर परेड निघाली आहे, ती शांततेत सुरु आहे. बहुतेक ठिकाणी मोठ-मोठ्या परेड निघाल्या तिथे हिंसा झालेली नाही. आता जी हिंसा झाली त्याला पूर्णपणे भाजपा सरकारचे पोलीस जबाबदार आहेत, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे.’
महत्वाच्या बातम्य
- चार्टर्ड इलेक्ट्रिकल सेफ्टी इंजिनियर्सची त्वरीत नियुक्ती करा; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘मोदींच्या द्वेषापोटी काँग्रेस शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे’
- शेतकरी आंदोलन चिघळले; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकर्त्यांनी उपसल्या तलवारी!
- ‘मोदी सरकारची दादागिरी, मस्ती खपवून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं’
- दिल्लीतील चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने उचलले महत्वाचे पाऊल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
