Share

चेहरा तजेलदार आणि टवटवीत हवा; तर करा ‘हा’ घरगुती उपाय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनेक कामांमुळे आलेला शारीरिक थकवा आपल्य चेहऱ्यावरही स्पष्ट दिसतो. यामुळे आपला चेहरा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतो. झोप पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशीही चेहरा सुजलेला वाटतो. सकाळी उठल्यानंतर चेहरा प्रसन्न आणि टवटवीत दिसावा, असे तुम्हाला वाटते का? तर यासाठी एक साधा आणि सोपा नैसर्गिक उपाय करून पाहा.

हे फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला केवळ दोन गोष्टींची आवश्यकता आहे. ज्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या उपलब्ध असतात. सुंदर आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी० टोमॅटोचे एक स्लाइस आणि चार ते पाच चमचे दूध या दोनच गोष्टी आवश्यक आहेत.

1.एका वाटीमध्ये चार ते पाच चमचे दूध घ्या. आता एक टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याचे एक स्लाइस कापा. टोमॅटोची साल काढावी. दुधामध्ये टोमॅटो मिक्स करा आणि चमच्याच्या मदतीने मॅश करा.

2.आता हे मिश्रण कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावा. दोन ते तीन मिनिटांपर्यंत हे मिश्रण सुकू द्यावे. यानंतर त्यावरच पुन्हा एकदा मिश्रण लावावे. वाटीतील संपूर्ण मिश्रण संपेपर्यंत ही क्रिया करत राहावी.

3.या फेस पॅकचा उपयोग करताना दोन गोष्टींची काळजी घ्यावी. पहिले म्हणजे फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. दुसरे म्हणजे हे पॅक चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवावे. फेस पॅक सुकल्यानंतर झोपताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. फेस पॅक लावून तुम्ही आरामात झोपू शकता.

4.सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. कॉटनच्या टॉवेलनं चेहरा स्वच्छ पुसून घ्या. यानंतर सर्वप्रथम चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा आणि थोड्या वेळानं मॉइश्चराइझर देखील लावा. हवे असल्यास आपण आपली आवडती क्रीम देखील लावू शकता. पण याआधी गुलाब पाणी लावणे आवश्यक आहे.

6.आठवड्यातून केवळ दोनदा या फेस पॅकचा उपयोग केल्यासही तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. कारण या फेस पॅकमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा देखील होतो. चेहऱ्यावर डाग, मुरुम इत्यादी समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.

महत्वाचे : त्वचेशी संबंधित समस्यांवर कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे स्किन केअर रुटीन फॉलो करण्याची चूक करू नये. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!