वाराणसी : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन हा त्याच्या एका फोटोमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. बोटीमध्ये बसलेला शिखर धवन पक्षांना दाणे देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 19 जानेवारीला शिखर वाराणसीला गेला होता. तिकडे बोटीमध्ये बसून शिखर पक्षांना खायला देत होता. याप्रकरणी पोलिसांनी नाविक प्रदीप साहनी याच्यावर तीन दिवस बोट चालवायला पोलिसांनी बंदी घातली आहे.
बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाने पक्षांना दाणे खायला देण्यावर बंदी घातली आहे. पण शिखर धवनचा हा फोटो व्हायरल झाल्यामुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी चौकशीला सुरूवात केली. या चौकशीनंतर नाविकावर कारवाई करण्यात आली. शिखर धवन यानेच इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेयर केला. पक्षांना खायला देण्यात आनंद मिळतो, असं कॅप्शन शिखर धवनने या फोटोला दिलं होतं.
https://www.instagram.com/p/CKVzFwFASot/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की, ‘धवन नावेतून विहारासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं काही पक्षांना खाऊ घातलं. बर्ड फ्लूचं संकट असल्यामुळे परदेशी पक्ष्यांना दाणे खायला घालण्यावर बंदी आहे. धवनने पोस्ट केलेल्या फोटोत तो पक्ष्यांना दाणे देताना दिसत आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे आणि शिवाय त्या नाविकावरसुद्धा कारवाई केली जाणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा; कॉंग्रेसची जोरदार मागणी
- ग्रामसेवकाची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण
- मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करु – दरेकर
- शेतकऱ्यांनी राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू- विश्वास नांगरे पाटील
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘हे’ बडे नेते आज मोर्चात सहभागी होणार


