Share

कृषी कायदे रद्द होणार नाहीत; गिरीश बापटांचा पुनरुच्चार

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर वाटत नसल्याचं वक्तव्य भाजप खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या राज्यात काम करत आहोत आणि तसंच काम करत राहणार आहोत असंही बापट यांनी सांगितलं आहे. मला सध्यातरी हे सरकार काही अस्थिर वाटत नाही. हे सरकार जेव्हा पडेल तेव्हा पडेल. पडलं नाही तरी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या राज्यात काम करत आहोत आणि तसंच काम करत राहणार आहोत,’ असंही गिरीश बापट म्हणाले आहेत.

बापट पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायदा केला आहे. तो रद्द होणार नाही. पण त्यामध्ये काही सुधारणा केल्या जातील. तसंच कायदा मागे घेतला जाणार नाही यावर सरकार ठाम आहे. हे कायदे शेतकर्‍यांच्या जीवनात बदल घडविण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहेत. गेली दोन महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी झाले आहेत. हे सरकार अस्थिर करण्यासाठी काम केलं जात आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अशांतता निर्माण करण्याचं काम आपल्या राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्ष करीत आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने केलं पाहिजे.

आज मुंबईत होत असलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी होत आहेत. त्यांनीदेखील अशाच कायद्याचे विचार अनेकवेळा मांडलेले आहेत. तेच त्यांच्या मूळ विचारला विरोध करत आहेत. जे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. तेच आम्ही मांडत आहोत. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि देशातील विरोधी पक्षांनी विरोध करू नये. यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!