Share

‘लवकरच भारतात येतोय’ ; बेन स्टोक्सने ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिल्यानंतर टीम इंडिया इंग्लडविरुद्ध  भिडण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे.

सध्या भारत दौऱ्यातील पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी निवड झालेल्या इंग्लंड संघातील काही खेळाडू श्रीलंकेत असून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे हे खेळाडू २६ जानेवारीनंतर श्रीलंकेतून भारतात येतील. तर काही खेळाडू इंग्लंडमधून भारतात येणार आहे. यात बेन स्टोक्स या अष्टपैलू क्रिकेटपटूचाही समावेश आहे.

स्टोक्सला जोफ्रा आर्चरसह श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती दिली होती. तसेच सलामीवीर रॉरी बर्न्स देखील त्याच्या पहिल्या अपात्यच्या जन्मामुळे मायदेशी होता. त्यामुळे हे तिघेही आता लवकरच भारतात येतील.

याबाबत स्टोक्सने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात तो विमानात बसलेला फोटो त्याने शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की ‘सी यू सून इंडिया'(लवकरच भारतात येत आहे). स्टोक्सचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी आर्चर, स्टोक्स आणि बर्न्स या तिघांचेही इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. तर इंग्लंडने श्रीलंका दौऱ्यात खेळलेल्या सॅम करन आणि जॉनी बेअरस्टोला विश्रांती दिली आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!