Share

देवमाणसातील राक्षस; मुलगा न झाल्याने डॉक्टरकडून पत्नीसह मुलीला मारण्याचा प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

बीड : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे एक धक्कादायक प्रकार घडला. ‘तुला मुलगा का होत नाही म्हणून डॉक्टर पतीने 4 महिन्याच्या चिमुकलीसह पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सदरील विवाहितेचे बीडच्या केज तालुक्यातील सारोळा येथे माहेर आहे. सुदैवाने पेटवताना काडीपेटी भिजल्यामुळे दुसरी शोधेपर्यंत घरातून पळ काढल्याने पीडितेचा आणि मुलीचा जीव वाचला आहे.

‘वेदना असह्य होत असल्याने तिला शासकीय जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. चार महिन्याची मुलगी अद्यापही राहत्या घरीच आहे. तिच्या जिवाला धोका आहे, हा सर्व प्रकार कळंब पोलीस ठाण्याचे एपीआय यांना देखील सांगितला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक अडीच वर्षांची मुलगी, दुसरी चार महिन्याची मुलगी आहे असं पीडितेच्या भावाने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, केज तालुक्यातील सारोळा येथील प्रियंका ढाकणेचा कळंब येथील विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विशाल हा डॉक्टर आहे. पहिल्यांदा मुलगी झाल्याने प्रियंकाला घरात सासरच्याकडून मुलासाठी त्रास दिला जात होता. मात्र, नंतर प्रियंका गरोदर राहिल्यानंतरमुलगा होईल या अपेक्षेने त्रास कमी दिला. मात्र, चार महिन्यांपूर्वी पुन्हा दुसरी मुलगीच झाल्याने पती आणि सासरच्या मंडळीनी ‘तुला मुलं का होत नाही’ म्हणून मारहाण शिविगाळ केली. तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचे प्रियंकाने सांगितले.

रात्री भांडण झालं आणि माझ्या नवऱ्याने मला मारहाण करत माझ्या अंगावर व माझ्या लहान मुलीचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काडेपेटी भिजल्याने दुसरी शोधेपर्यंत मी पळ काढला. माझी चार महिन्याची चिमुकली तिथेच आहे. तिला वाचवा’ असा आक्रोश करत प्रियंकाने टाहो फोडला. तिने रात्री उशिरा कळंब बसस्थानकात येऊन फोनवरून आई वडिलांना कळवले. यानंतर आईवडिलांनी तिला बीडला आणत रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पीडित प्रियंका घुगेच्या तक्रारीवरून पती डॉ.विशाल घुगे विरोधात कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!