Share

राज्यात सुरु होणार ‘जेल टुरिझम’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारीला उद्घाटन

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: राज्यात पहिल्यांदाच जेल टुरिझम सुरू करण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची आज घोषणा केली. येत्या 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या जेल टुरिझमचं उद्घाटन करण्यात येणार असून पुण्यातील प्रसिद्ध येरवडा तुरुंगापासून हे जेल टुरिझम सुरू होणार असल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राज्यात ६० तुरूंग आहे. जवळपास २४ हजार कैदी या तुरूंगात आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. जेल पर्यटनाची सुरूवात आम्ही करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

२६ जानेवारीपासून याची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचं उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण स्वतः गोंदियातून या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

जेल टुरिझमसाठी लहान मुलांना पाच रुपये, विद्यार्थ्यांना दहा रुपये आणि सामान्य नागरिकांना 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंग दाखवल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात इतर तुरुंगही दाखवण्यात येणार आहेत, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!