लातूर : ‘समाजाने धिक्कारले…गावाने नाकारले…पण आम्हाला देश स्वीकारणार, ‘आम्ही जातो आमच्या गावा… आमचा राम राम घ्यावा’ ही वाक्ये तुम्ही सिनेमात ऐकली असतील. मात्र, एका अवलियाने या वाक्यांना प्रत्यक्षात उतरवून बॅनर झळकावले आहे. एवढ्यावरच तो गडी थांबला नाही, तर त्याला मतदान केलेल्या मतदारांचे त्याने जाहीर आभार मानलेत. मतदार किती.. तर बारा!
जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक विकास शिंदे या युवकाने लढवली होती. मात्र, त्याचा निवडणुकीत पराभव झाला. त्यावर त्याने ‘आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बारा मतदारांचे जाहीर आभार’ असे बॅनर गावात झळकावले आहे.
या बॅनरवर आणखीन अनेक वाक्ये लिहले होते. त्यामध्ये, ‘ना जातीसाठी… ना धर्मासाठी… आमचा लढा फक्त मातीसाठी…, ”वाटले होते गड्या आपला गाव बरा, पण तुम्ही म्हणले पसारा भरा” या मजकुराचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूज झाल्यावर असा बॅनर लावून आभार मानणारा विकास शिंदे हा एकमेव उमेदवार असेल.
दरम्यान, बीड जिल्ह्यात एक अजब प्रकार घडलाय. अंबाजोगाई शहरातील एका चौकात काही जणांनी कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहे. त्यामुळे शहरभर चर्चेचा विषय सुरू आहे. नेहमीच्या बॅनरबाजीला कंटाळलेल्या नागरिकांनी अशी गांधीगिरी केली असावी, असे म्हणत अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
बॅनरबाजीला कंटाळून म्हणा किंवा हौस म्हणून शहरातील सदर बाजार चौक परिसरात काहींनी मोती या कुत्र्याला शुभेच्छा देणारे बॅनर लावले. त्यावर ‘ जोजो तर्फे मोती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे वाक्य लिहिले आहे. शहरात असे बॅनर झळकल्याचे समजताच, अनेकांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. या वेगळ्या प्रकारच्या बॅनरमुळे उठसूठ कोणालाही शुभेच्छा देणारे मात्र नक्की खजिल झाले असणार.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून अजूनही व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे
- गुड न्यूज : जिओने बदलला ‘ हा ‘ रिचार्ज प्लॅन…
- उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘त्या’ उड्डाणपुलाचं नामकरण
- सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका; मुक्ता टिळक यांच्याकडून संशय व्यक्त
- सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका; मुक्ता टिळक यांच्याकडून संशय व्यक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
