Share

बॉल लागले, हेल्मेट फुटलं, खाली कोसळला पण बॅटिंग सोडली नाही; पुजाराच्या खेळीवर वडील भावूक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामन्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने चौथ्या दिवशी बिनबाद 4 धावा केल्या होत्या.

त्यामुळे पाचव्या दिवशी विजयसाठी आणखी 324 धावांची आवश्यकता होती. सामना रंगतदार स्थितीत होता. मालिका 1-1 ने बरोबरीत होती. भारताला विजयाची संधी होती. यामुळे टीम इंडिया पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. सर्वच खेळाडूंनी संयमी खेळी केली. सामना ड्रॉ होणार की भारतीय संघ आपल्या खात्यात हा सामना जमा करून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करणार, याकडे देशवासियांचं लक्ष होतं.

या युवा संघातील शुभमन गिल, रिषभ पंत यांच्यासह अनुभवी चेतेश्वर पुजाराने केलेल्या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ आला. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला लोळवलं आहे.

दरम्यान, ही मालिका जिंकण्यात भारताची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. साहजिकच चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांना लेकाच्या खेळीचा अभिमान वाटतोय. चेतेश्वरची म्हणजे माझ्या लेकाची खेळी मी कधीही विसरणार नाही एवढी अविस्मरणीय इनिंग त्याने खेळली आहे. त्याने त्याच्या खेळीने करोडो भारतवासियांचं आणि साहजिकच माझं हृदय जिंकलं.

बॅटिंग करताना चेतेश्वरच्या अंगठ्याला दुखापत झाली तसंच अनेक वेळा त्याच्या हेल्मेटला चेंडू लागले. त्यावेळी आम्हाला चिंता वाटत होती. परंतु त्याने त्याची बॅटिंग न थांबवता तसंच जिद्द न सोडता भारताच्या विजयासाठी तो खेळपट्टीवर तळ ठोकून राहिला. चेतेश्वर पुजारा म्हणजे भारतीय कसोटी संघाच्या पाठीचा कणा आहे, असा कौतुकाचा वर्षाव अरविंद पुजारा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!