Share

दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे : नरेंद्र मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला असंख्य मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.

यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचं अभिनंदनही केलंय. तसंच, बायडन यांच्यासमवेत काम करत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील भागिदारीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी संकल्पित आहे. भारत व अमेरिकेची भागिदारी आपल्यासाठी लाभदायक आहे.

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही मोदींनी अभिनंदन केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!