🕒 1 min read
कोल्हापूर:- लॉकडाऊन दरम्यान आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. कोरोनामुळे अनेकांना आर्थिक झळ सोसावी लागत असतानाच महावितरण विभाग वाढीव वीज बिल आकारात असल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दिवाळीपासून वाद सुरु झाला आहे. भाजपने वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलने केली होती. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
राज्य सरकारने लाईट बिल माफ केले पाहिजे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. सरकारशी दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत. ऊर्जामंत्र्यांनी काय करायचं ते करावे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. ‘लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली’ असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते. हिम्मत असेल तर घरगुती वीज कनेक्शन तोडून दाखवावे. मंत्र्यांनी राज्यातील दौरे करावे आणि घरगुती लाईट बिलासंदर्भात नागरिकांचे मत घ्यावे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे. येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये दिले होते. १०० युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. यंदा दिवाळीत नागरिकांना नक्कीच सप्रेम भेट मिळेल, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली होती. मात्र, आता लॉकडाऊनला येत्या मार्च महिन्यात वर्ष होत आलं असताना, अजूनही राज्यातील नागरिकांना वीजबिलातून दिलासा मिळालेला नाही. म्हणूनच राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘देवेंद्र फडणवीसजी तुम्ही कितीही प्रयत्न करा…आघाडीत बिघाडी काही होत नाही’
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
- वरिष्ठांच्या त्रासाला वैतागून बिडकीनच्या ग्रामसेवकाने घेतले विष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
