मुंबई : शक्ती कायद्यासंदर्भात विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्त्वपूर्ण सूचना व निवेदने प्राप्त झाली असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
या बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे तसेच विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर सदस्य उपस्थित होते.
मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सूचना मांडल्या. या समितीची पुढील बैठक औरंगाबाद येथे दि. 30 जानेवारी, 2021 रोजी होणार असून त्याठिकाणीदेखील महिला व वकील संघटनांकडून सूचना व निवेदने स्वीकारली जाणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पावसाळ्यापूर्वी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या; मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेला सूचना
- कृषी कायद्यांच्या विरोधात ८० वर्षांचा योद्धा उतरणार मैदानात
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
