पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो… असे मागणे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना कोश्यारी यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार गिरीष बापट, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर कोश्यारी हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आपण सर्वांनी धर्माचे रक्षण आणि पालन केले, तर आपला परिवार, देश व जगाचे कल्याण होईल. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जी सुंदर परंपरा सुरु केली आहे. ती आजही सुरु असून पुढील अनेक युगे ती सुरु राहिल. आपणही त्याच मार्गाने पुढे जाऊ असे सांगत गणपती बाप्पा मोरया चा जयघोष देखील त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- मोठा निर्णय : महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार…
- कृषी कायद्यांच्या विरोधात ८० वर्षांचा योद्धा उतरणार मैदानात
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
