Share

पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदी कोण? काँग्रेसमध्ये खलबतं सुरू, वरपुडकरांचेही नाव चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

परभणी : विधानसभेचे वर्तमान अध्यक्ष नानासाहेब पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तर विधानसभा अध्यक्षपदी कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेस हायकमांडने अद्याप महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. असे असले तरी पटोले जर प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्या जागेवर विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिमंडळाचे प्रतोद आमदार सुरेश वरपूडकर यांची निवड व्हावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांतून होत आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागच्या महिन्यातच दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पद, प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते पद अशी तीन पदे होती. बाळासाहेब थोरातांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच नवीन प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरू होता. यासाठी वडेट्टीवार, यशामती ठाकूर, नाना पटोले आदी दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. आता मात्र प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदावर कोण? असा प्रश्न पुढे येत आहे. यासाठीही काँग्रेस  हायकमांड शिवसेना व राष्ट्रवादीशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळेच या पदावर काँग्रेस समितीचे विधिमंडळाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपुडकर यांची ज्येष्ठतेनुसार निवड व्हावी, अशी अपेक्षा वरपुडकर यांच्या समर्थकातून व्यक्त होत आहे. काँग्रेस श्रेष्ठींनीसुद्धा या अनुषंगाने विचारविनिमय सुरू केल्याचा दावा केला जात आहे. वरपुडकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व केलेले आहे. विधानसभेत चार वेळा ते निवडून गेलेले आहेत. एकदा खासदार म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावलेली आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर कोण येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!