🕒 1 min read
औरंगाबाद : गावातील लोक सुशिक्षित अन् समजदार आहेत. गावाला पुढे घेऊन जाणारे सर्व लोक आहेत. त्यामुळे, गावचा विकास थांबणार नाही. गावच्या राजकारणात अनेक हेवेदावे असतात. पण, निवडून आलेल्या उमेदवार मुलीच्या गळ्यात माझ्या मुलीने हार घातला. यावरून आपण सर्व लक्षात घेतले पाहिजे, असे भास्करराव पेरे पाटील म्हणालेत. यापुढे मी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. त्यासाठी, मी स्वत: वेगळं कार्यालय सुरू केले, अशी माहिती पेरे पाटील यांनी दिली.
राज्यात सगळीकडे ग्रामपंचायतीचा निकालांमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसलाय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटलांसह अनेकांना धक्के बसते. पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचले, त्यांच्याच पॅनेलला मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. माझ्या मुलीचा पराभव माझ्यासाठी धक्कादायक निकाल नसल्याचे पेरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशाने इंदिरा गांधीसारख्या नेत्यांचाही पराभव पाहिलाय, अशा शब्दात पेरे पाटील यांनी मुलीच्या पराभवाबाबत मत व्यक्त केले.
गेल्या २५ वर्षापासून पाटोदा ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून भास्करराव पेरे पाटील काम करत होते. या काळात पेरे पाटलांनी गावचा जो विकास केला त्याचे कौतुक देशभरात झाले. आदर्श गाव म्हणून पाटोद्याला ओळख मिळाली. यंदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. गावच्या तरूण पिढीला पुढे आणण्यासाठी मी माघार घेतल्याचे ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- रिपब्लिक चॅनेलचे सदयत्व रद्द करा, NBA ची IBF कडे मागणी
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- ‘गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत,त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
