🕒 1 min read
परळी:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे तक्रारदार महिलेकडून मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जात आहे. परंतु चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या पाठीमागचे शुल्ककाष्ठ दूर होण्यासाठी एका नगरसेवकाने प्रभू वैद्यनाथ यांच्या चरणी दंडवत घातलं आहे. परळीतील नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी सपत्नीक प्रभू वैद्यनाथ चरणी दंडवत घातलं आहे. नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी तब्बल दोन किलोमीटर अंतर कापत प्रभू वैद्यनाथाला दंडवत घालत प्रार्थना केली. ढोल ताशांच्या गजरात हे दंडवत घालण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- रिपब्लिक चॅनेलचे सदयत्व रद्द करा, NBA ची IBF कडे मागणी
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- ‘गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत,त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
