🕒 1 min read
मुंबई : कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता जवळ जवळ सर्वच क्षेत्रातील कर्मचारी आपल्या घरूनच काम करत होते. यामध्ये लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या.
त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे. यासाठी HDFC बँकेनं एक कॅम्पेन सुरू केलं होत. या कॅम्पेनचं नाव ‘मूंह बंद रखो’ असं ठेवण्यात आलं आहे. देशभरात पुढील चार महिन्यांसाठी बँक एक हजार वर्कशॉप चालवले होते. बॅकेच्या नुसार फोन, एसएमएस, ईमेल आणि सोशल मीडियावर कार्ड डिटेल्स, CVV, एक्सपायरी डेट, ओटीपी, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, लॉग इन आयडी आणि पासवर्ड शेअर न करता पैसे सुरक्षित ठेवू शकता, असं बँकेनं सांगितलं होत.
त्यानंतर आता पुन्हा कोरोना लसीच्या नावाखाली अनेकांना लुबाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या सायबर क्राईम सारख्या घटनांपासून सुरक्षित राहावं, यासाठी एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा ‘तोंड बंद ठेवा’ या मोहिमेअंतर्गत आपली वैयक्तिक माहिती कुणासोबतही शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे
लसीकरणासाठी नोंद करण्यासाठी किंवा लसीच्या रजिस्ट्रेशनच्या नावाने काही भामट्यांकडून पैसे मागितले जात आहेत. मात्र, सरकारकडून अशी कोणतीही प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. याबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून एचडीएफसी बँकेने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्य कर्मचारी कधीही तुम्ही किती पैसे कमवतात, तुमचं कोणत्या बँक खात्यात पैसे आहेत याबाबत विचारणार नाहीत. तसेच ते लसीसाठी पैसे मागणार नाहीत. त्यामुळे सतर्क राहा, असं एचडीएफसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा; जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या!”
- राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण
- डीएचएफएल’ च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !
- सासऱ्यांच्या निधनानंतर नताशाने शेअर केली भावुक पोस्ट
- तांडव सीरिजच्या निर्मात्याने अखेर मागितली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
