मुंबई : कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर शनिवारी दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या वडिलांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. दरम्यान, हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यापाठोपाठ आता हार्दिकची पत्नी नताशाहिने देखील भावूक झाल्याचे दिसत आहे. नुकताच नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगा अगस्त्य आणि सासरे हिमांशु पांड्या यांचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, सासऱ्यांच्या आठवणीत नताशाने लिहले आहे की, “तुम्ही आम्हाला सोडून गेलात, यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही आपल्या कुटुंबातील सर्वात कणखर आणि मजेशीर सदस्य होतात. तुमच्या अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत. तुमच्या जाण्याने सर्वानांच मोठा धक्का बसला आहे. मला आनंद आहे की, तुम्ही तुमचे जीवन नेहमी स्वताच्या अंदाजात जगलात. मी अगस्त्यला त्याच्या आजोबांच्या या गोष्टी नक्की सांगेल”, अशा आशयाची पोस्ट नताशाने इंस्टग्रामवर केली आहे.
https://www.instagram.com/p/CKJyOFTA0_9/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी हार्दिकने वडिलांसोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली होती. “तुम्हाला आम्ही गमावले आहे. ही गोष्ट आम्ही आयुष्यात कधीही स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी गोड आठवणी ठेवून गेलात. आज तुमची मुले जे काही मिळवू शकली आहेत. ते फक्त तुमच्यामुळे.’ ‘तुम्हाला गर्व होता. पण आम्हाला सर्वांना गर्व आहे की, तुम्ही तुमचे जीवन आनंदात घालवले. तुमची नेहमी आठवण येईल”, अशा प्रकारे हार्दिकने वडिलांचे निधन झाल्यानंतर आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- ‘कोकणात भगवा फडकला…पण तो भाजपाचा!’
- बहिष्कार, भाऊबंदकी आणि धुरळा; अकलूजची चर्चाच चर्चा
- निकाल लागले, आता सरपंचपदाची आरक्षण सोडत कधी? हसन मुश्रीफ म्हणाले…


