Share

तांडव सीरिजच्या निर्मात्याने अखेर मागितली माफी

Published On: 

मुंबई : तांडव वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याच्या आरोप या वेब सिरिजवर करण्यात आला. भाजप नेत्यांनी या वेब सिरिजच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. आता तांडवचे निर्माते अली अब्बास जफर यांनी याबाबत जाहिर माफी मागितली आहे. याबाबतचे ट्विट करुन निर्मात्यांनी माफी मागितली. ‘वेब सिरिजच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता’, असे तांडवच्या ऑफिशिअल कास्ट एंड क्रूच्या वतीने सांगण्यात आले आहे. या वेब सिरिजच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असेही तांडवच्या संपूर्ण टिम कडून सांगण्यात आले आहे.

‘तांडव ही वेब सिरिज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही लक्षात घेत आहोत. या वेब सिरिजमधील एका सीनमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता आम्ही या तक्रारी गांभीर्याने घेत आहोत. तांडव ही वेब सिरिज पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दाखवण्यात आलेल्या घटना पूर्णता काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, जाती समुह त्याचप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरिही ज्या लोकांच्या या वेब सिरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो’, असे ट्विट तांडवचे निर्माते अली अब्बास झफार यांनी केले आहे.

सैफ अली खानची वेब सीरीज तांडव सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता या वेब सीरीजवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत या वेब सीरीजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती आणि आता लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

लखनऊमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा प्रकरणी या वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्णा मेहरा, लेखक गौरव सोलंकी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याशिवाय माहिती व प्रसारण मंत्रालयही तांडव या वेब सीरिजच्या विरोधात आहे. मंत्रालयाने या वेब सीरीजसंदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमला नोटीस दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!