Share

ग्रामपंचायत निवडणूक : ‘या’ गावात महाविकास आघाडीसह भाजपला आठलेंनी केले चारीमुंड्या चीत

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, आज सकाळपासून येत असलेल्या निकालांमुळे एका बाजूला  शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत असताना एका ग्रामपंचायत निवडणुकीत या चारही पक्षाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या गटाने धोबीपछाड दिला आहे.

अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतआरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे.आठवले गट बॅगेहळ्ळीत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!