Share

अणदूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना धक्का

Published On: 

उस्मानाबाद : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मोठा धक्का बसलाय. कारण, अणदूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वातील पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. अणदूर ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 16 जागांवर मधूकर चव्हाण यांच्या गटातील उमेदवारांचा विजय झाला आहे. तर एक जागा भाजपच्या पारड्यात पडली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. पळसप हे विक्रम काळे यांचं मूळ गाव आहे. पळसपमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना होता. पळसप ग्रामपंचायतीत एकूण 13 जागा आहेत. त्यातील 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. 5 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामुळे पळसपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 5 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आलाय. भाजपला मात्र इथे भोपळाही फोडता आला नाही.

कळंब तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायतीवर राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वातील पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. 7 जागांच्या या ग्रामपंचायतीवर 6 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर एका जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय मिळाला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी चांगलाच जोर लावला होता. पण भाजपचे जिल्हाध्यक्ष नितील काळे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलचा विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!