Share

महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं होता.

या निवडणुकीमध्ये महाविकास आगाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगल यश मिळताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे म्हणाले, “मला वाटतं जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीवर आहे. ही नेते मंडळी चांगलं काम पाहत आहेत. यांनी चांगल्या पद्धतीने करोनाची परिस्थिती सांभाळली असून अजूनही सांभाळत आहोत. आपण हळूहळू सर्वकाही उघडत आहोत. लोकांची काळजी घेऊन कुठेही घाईगडबड न करता जबाबदारीनं काम करत आहोत. त्याचबरोबर पर्यावरण, उद्योग क्षेत्राला आपण पुढे घेऊन चाललो आहोत.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!