🕒 1 min read
कोल्हापूर:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.
कोल्हापूरच्या सेवा रुग्णालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थित कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अक्षता चोरगे यांना पहिली लस देण्यात आली. विशेष म्हणजे अक्षता चोरगे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी अनोखं गिफ्ट मिळाल्याने अक्षता चोरगेही उत्साहात आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस निर्मिती करण्यावर काम सुरु होतं. कित्येक संस्था, शास्त्रज्ञ लसनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत होते. संशोधकांचे हे प्रयत्न यशस्वी झाले असून आता संपूर्ण देशात प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली आहे. या लसीकरणाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्धाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’
- ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान
- सुरक्षा व्यवस्थेत कपात करणे ही राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक – रामदास आठवले
- शिक्षणाचा रोड मॅप तयार करा,शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
- महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा होणार संपूर्ण कायापालट


