Share

‘सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही शरद पवारांना रामजन्मभूमी अजूनही वादाचा मुद्दा वाटतो’

Published On: 

मुंबई : ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.

आता, या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला जात असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे. निधी संकलनासाठी नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील उपस्थित होते. घटनात्मक पदावर असताना त्यांच्या उपस्थितीचा विषय अनेकांना खटकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांसंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर आले होते. यावेळी त्यांना राज्यपालांच्या उपस्थितीविषयी प्रश्न केला असता, ‘राज्याचे राज्यपाल हे सर्वांचे आहेत. ते राज्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत. ज्या प्रश्नाबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होते त्यावेळी अशा प्रश्नांपासून दूर राहण्याचं काम शहाणपणाचं आहे असं मला वाटतं’ असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ज्या मुद्द्यावरून वाद आहेत त्यापासून दूर राहणं हेच शहाणपणाचं; राम मंदिर मुद्द्यावरुन पवारांचा राज्यपालांना टोला… सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट निकाल देऊनही शरद पवारांना रामजन्मभूमी हा अजूनही वादाचा मुद्दा वाटतो… ‘बाबरी’ची हळहळ अजून कायम असल्याचे परिणाम…’ अशी जहरी टीका भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!