Share

…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आरपीआय आंदोलन करणार 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बहुजनांचे संघर्षनायक नेते केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा दोन दिवसांत पूर्ववत करण्यात आली नाहीतर येत्या दि.17 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानी रिपाइं तर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बहुजन विद्यार्थी पतिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिलाआहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकार विरोधात मंगळवार दि. 12 जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्याचा ईशारा दिला.

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा राज्य सरकार चा निर्णय हा राजकीय द्वेष भावनेतून आणि कोत्या मनोवृत्तीतून घेण्यात आलेला चुकीचा निर्णय आहे. त्याबाबत फेरविचार करण्याचे राज्य सरकार ला निर्देश द्यावेत या मागणीसाठी लवकरच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वात रिपाइंचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे रिपाइं तर्फे अधिकृत कळविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!