Share

नाशिकमध्ये यंदाचे मराठी साहित्य संमेलन, भुजबळ यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नाशिक– साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक कसे होईल, यासाठी आपण सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

यंदाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार हे निश्चित झाले आहे. यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य मंडळाकडे मागणी केली होती. याबाबत लोकहितवादी मंडळातील काही सदस्यांनी आपली भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानुसार त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आपण कळविले होते. त्यानंतर आज साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिकला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहे. या भूमीची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास होणे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. हे संमेलन मार्च महिन्यात होणार आहे. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक कसे होईल, यासाठी आपण सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देऊ तसेच नाशिककरांच्या वतीने देशभरातून आलेल्या साहित्यिकांचा योग्य असा मान-सन्मान ठेवला जाईल असेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. संमेलनाची माहिती देण्याकरिता औरंगाबादेत पत्रकार परिषद घेण्यात आली. संमलेनाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस संमेलन भरवले जाईल असे ठाले पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!