Share

सावधान ! कोरोना लसीसाठी ऍप डाऊनलोड करू नका आरोग्य विभागाची सूचना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली आहे. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर लसीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, यासाठी सरकारकडून योजना आखल्या जात आहेत. त्यामध्ये आता को-विन (Co-WIN) हे मोबाइल ऍप सरकारकडून विकसित केलं जात आहे. त्याद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून, सरकारी यंत्रणेलाही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणं सोपं होणार आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअर, ऍपल ऍप स्टोअरसह जिओ फोन्सवरही उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे आता लोक हे ऍप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चुकूनही हे ऍप डाऊनलोड करू नका अशा सूचना सरकारनं दिल्या आहेत. याचं कारण म्हणजे सरकारनं अद्याप हे अॅप उपलब्ध करून दिलेलंच नाही आहे.

CoWIN App च्या नावानं काही बनावट ऍप तयार करण्यात आले आहेत. जे डाऊनलोड केल्यानं तुम्ही फ्रॉडचे शिकार होऊ शकता. तुमची फसवणूक होऊ शकते. याबाबत सरकारनं सावध केलं आहे. त्यामुळे कृपया हे ऍप डाऊनलोड करू नका. सरकारकडून अॅप उपलब्ध झाल्यानंतर सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती दिली जाईल, असंही सरकारनं सांगितलं आहे.

COVID-19 वॅक्सिन ट्रॅकिंग आणि रजिस्ट्रेशन निश्चित करण्यासाठी CoWIN  ऍपला 5 मॉड्यूलमध्ये विभागण्यात आलं आहे. ज्यात पहिलं प्रशासनिक मॉड्यूल, दुसरं रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरं वॅक्सिनेशन मॉड्यूल, चौथं लाभान्वित स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवं रिपोर्ट मॉड्यूल आहे. जे लोक लसीकरण करू इच्छितात, त्यांना रजिस्ट्रेशन मॉड्यूल अंतर्गत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. वॅक्सिनेशन मॉड्यूलमध्ये त्यांचा तपशील पडताळला जाईल आणि लाभान्वित स्वीकृती मॉडेल त्यांच्या लसीकरणाबाबत त्यांना एक प्रमाणपत्र पाठवेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!