🕒 1 min read
मुंबई : गेल्यावर्षी शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यामुळे दोन दशकांहून अधिक काळ मित्र असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये जरी संघर्ष दिसून येत असला तरी ज्येष्ठ नेत्यांमध्ये जुन्या मैत्रीचा ओलावा कायम असल्याचं काल सिद्ध झालं आहे. केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. ही भेट जोशींच्या निवासस्थानी झाली.
त्यांची भेट घेताना नितीन गडकरी यांनी जोशी सरांना आदरपूर्वक वाकून नमस्कार केला. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या भेटीनंतर मनोहर जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘गडकरींनी स्वतःहून सांगितलं मी भेटण्यासाठी येतोय. मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी घरी गेलो. नितीन गडकरींची मला पूर्ण माहिती आहे.’ असं देखील ते आवर्जून म्हणाले.
तर, ‘त्यांनी माझ्या नातवाशी चर्चा केली. गडकरी घरी आल्याचा आनंद झाला. त्यांचे मुख्य वैशिष्टय आहे स्पष्टवक्तेपणा. यामुळे राजकारणात अनेकदा नुकसानही होते. पण त्याची पर्वा न करता गडकरी त्यांच्या मनात जे आहे ते बोलतात. ते बराच वेळ माझ्या घरी बसले होते. आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. मग ते गेले. ती राजकीय भेट नव्हती. सामाजिक भेट म्हणाल तर जरूर होती’ अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिली आहे.’
महत्वाच्या बातम्या
- कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चितपणे घेतली जाईल- पवार
- शेतकरी आंदोलना दरम्यान शिख गुरूंच्या प्रकाश पर्वासाठी पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून राजकारण
- ‘हे सरकार पाडले जात नाही, मनासारखे सरकार येत नाही तोवर सही करणार नाही’
- उदयनराजेंनी आपल्या ‘स्टाईल’मध्ये अचानक दाखल होऊन केलं रखडलेलं उदघाटन
- नोरा फतेहीला करायचे तैमूरशी लग्न, करीना म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
