🕒 1 min read
सातारा : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे १३ वे वशंज व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे कायमच आपल्या स्टाईल आणि डायलॉगबाजीने चर्चेत असतात. साताऱ्यातील राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासह छत्रपतींचे वंशज असल्याने त्यांचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत.
आपल्या बिनधास्त वागण्याने अनेक किस्से घडत असतात. कार्यकर्त्याने व्यक्त केलेल्या इच्छेसाठी कधी ते रायडर बनतात, तर कधी अचानक त्यांना भेटी देतात. आज उदयनराजेंनी सातारकरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे उदघाटन केले.
पोवई नाका भागात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेप्रेटर बांधण्यात आला आहे. गेल्या पावणेतीन वर्षांपासून याचं काम सुरु होतं. ग्रेडसेप्रेटरचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करावयाचे असल्याने याचे उदघाटन रखडले होते. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
दरम्यान, शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले या ग्रेड सेपरेटरच्या सर्व मार्गिकांची आतून पाहणी करणार असल्याचे सांगितले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी लगेचच पाहणीचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांसह आज दाखल झाले. याचवेळी त्यांनी अचानक उदघाटन उरकून घेऊन याचे लोकार्पण देखील केले.
यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर उदयनराजेंनी आपली डायलॉग बाजी करून पुन्हा आपली स्टाईन दाखवून दिली. “मी आदत से मजबूर” असून असे धक्के द्यायची मला सवय आहे. कधी कधी हे धक्के मी देतो आणि कधी कधी हे धक्के मलाही बसतात. असंही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी कॉलर उडवत, ‘, जशी इतरांची स्टाईल असते, तशी माझीही स्टाईल आहे. मला कोणी शाबासकी देवो अगर ना देवो ही माझी पद्धत आहे,’ असं विधान केलं.
सातारा शहरवासीयांसाठी स्वप्नवत व महत्वकांक्षी असलेला प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज ग्रेडसेपरेटर चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले.
सातारा शहराची मोठी वाहतूक कोंडी या भव्य प्रकल्पामुळे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. pic.twitter.com/9fkszLOsiq— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चितपणे घेतली जाईल- पवार
- शेतकरी आंदोलना दरम्यान शिख गुरूंच्या प्रकाश पर्वासाठी पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून राजकारण
- ‘हे सरकार पाडले जात नाही, मनासारखे सरकार येत नाही तोवर सही करणार नाही’
- अचंबित…स्मिथची दांडी उडवल्यानंतर जडेजाच ‘या’ माजी खेळाडूकडून कौतुक
- नोरा फतेहीला करायचे तैमूरशी लग्न, करीना म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
