🕒 1 min read
चंडीगड: गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारने केलेल्या तिन्ही कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या चर्चा निष्फळ ठरत आहे. सरकार चर्चेला तयार आहे. पण कृषी कायदे रद्द केले पाहिजेत त्यानंतरच चर्चा असे शेतकऱ्यांची मागणी आहे.
दरम्यान, पंजाब मध्ये शिखांच्या सर्वोच्च संस्था शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिख गुरु तेगबहादुर यांच्या 400व्या प्रकाश पर्वासाठी निमंत्रित न कराण्याचा निर्णय घेतला आहे.
यावरून पंजाबमध्ये राजकाराण सुरु झाले असून कैबिनेट मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा म्हटले की, गुरु तेगबहादुर हे सर्व देशाचे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना न बोलावणे योग्य नाही. कॉंग्रेसने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. मात्र आम आदमी पार्टी, शिरोमणि अकाली दल यांनी या निर्णयाला पाठींबा दिला आहे.
यावर भाजप ने देखील प्रतिक्रिया देत कॉंग्रेसच्या गुरु तेगबहादुर हे सर्व देशाचे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना प्रकाश पर्वाला निमंत्रित करायला हवे कारण पंतप्रधान हे कोणत्या पक्षाचे नसतात तर ते देशाचे असतात. कॉंग्रेसच्या या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.
हा कार्यक्रम एप्रिल महिन्यात पार पडणार असून याची तयारी नोव्हेंबर पासूनच सुरु झाले आहे. यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात येत आहे. पंजाब सरकार द्वारा या पार्श्वभूमीवर तयारी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत वाद नको म्हणून ठाकरेंनी ‘या’ नेत्याची केली हकालपट्टी
- संजय राऊतांनी नामांतराबाबत काँग्रेसच्या ‘मनातलं’ सांगितलं, म्हणाले…
- अमेरिकन हिंसाचारात तिरंगा ! शिवसेना खासदार संतापल्या…
- माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो; पवारांच्या पोलिसांना सूचना
- ‘राष्ट्रवादी आवाजाला गप्प केलं गेलं तर…’चौकशीला जाण्याआधी कंगनाचा व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
