Share

महाविकास आघाडीत वाद नको म्हणून ठाकरेंनी ‘या’ नेत्याची केली हकालपट्टी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा प्रभाव ओसरायला सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांचे राजकीय पक्षबदल सुरु झाले आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेनं भाजपची महायुती सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर आघाडीमध्ये अनेक कुरबुरी दिसून आल्या होत्या.

तर, भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. हे तीन-तिघाडी सरकार पायात पाय अडकून पडेल आम्ही पडण्याची गरज नाही असं भाजप नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी आमदार निलेश लंकेंच्या पुढाकाराने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

महाविकास आघाडीतील पक्षाने आपल्याच मित्रपक्षाला सुरुंग लावण्याची ही पहिली वेळ होती. यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे त्या नगरसेवकांना पुन्हा घरवापसी करावी लागली होती. याचीच पुनरावृत्ती घडण्याची शंका येताच उद्धव ठाकरे यांनी कठोर पाऊल उचललं आहे.

सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. अधिक माहितीनुसार, महेश कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते.

मात्र, महाविकास आघाडीतील पक्षांमधील अंतर्गत फोडाफोडी वाढून नाराजी होऊ नये म्हणून त्यांचा पक्षप्रवेश तूर्तास लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. महेश कोठे हे सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजताच त्यांच्यावर पक्षाने कार्नवाई केली आहे. दरम्यान, आता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश कधी होईल हे अस्पष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!