Share

भाजपला खिंडार : माजी आमदारासह ‘या दिग्गज नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

Published On: 

नाशिक : शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नाशिकमधील भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.

अलीकडेच नाशिकमधील माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे झालेले डॅमेज कंट्रोल करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. या अनुषंगाने भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

याप्रसंगी खा. राऊत म्हणाले, “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीनं या दोघांचं शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे.”

शिवसेनेचा हा कुठलाही मास्टर प्लान नाही तर आता प्रवाह बदलोय, हवा बदलतेय अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच कोणत्याही परिस्थितीत नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही मूळ शिवसैनिक आहेत. वसंत गीते हे नाशिक मध्ये शिवसेनेचे पाहिले महापौर होते. मनसे स्थापन झाल्यानंतर वसंत गीते यांनी राज ठाकरे यांना साथ दिली. नंतर ते मनसेचे आमदार देखील झाले. भाजपाची सत्ता आल्यानंतर ते या पक्षात दाखल झाले होते.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कधीकाळी अत्यंत जवळीक असलेले आणि नाशिकला मनसेचा बालेकिल्ला बनवण्यात सिंहाचा वाटा असणारे वसंत गीते पुन्हा मनसेत यावेत यासाठीदेखील मनसेकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र एकूणच शहरातली राजकीय परिस्थिती पाहता गीते शिवसेनेत जायचा त्यांनी निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!