🕒 1 min read
मुंबई: कोरोना नंतर जगाचे लक्ष वेधले होते ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे यामध्ये निवडणुकांनंतर लागणाऱ्या निकालाविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयामध्ये धावही घेतली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली हार आणि जो बायडन यांचा विजय अद्यापही पूर्णपणे स्वीकारलेला नाही. तर आता त्यांच्या समर्थकांनी संसदेत धुडगूस घातला. डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. यावेळी हॉलीवूडच्या एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असे नाट्य अमेरिकन संसदेवर रंगले होते. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा जगभरात निषेध व्यक्त केला जात आहे.
या सर्व घटनाक्रमामध्ये आंदोलकांपैकी एकाच्या हातात चक्क भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. त्यावरुन आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच संतापल्यात. तर भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आंदोलकांपैकी एकाच्या हातात तिरंगा दिसल्यानंतर, “जो कोणी भारतीय झेंडा फडकवतोय त्याला लाज वाटली पाहिजे. दुसर्;या देशात सुरू असलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका”, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Whoever is waving this Indian flag should feel ashamed. Don’t use our tricolour to participate in such violent & criminal acts in another country. pic.twitter.com/CuBMkq9Siu
— Priyanka Chaturvedi???????? (@priyankac19) January 7, 2021
तसेच भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी या घटनेवर सवाल उपस्थित केला आहे. ट्विटरद्वारे, तिथे भारताचा झेंडा का आहे? असा सवाल त्यांनी विचारलाय. ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाहीये असंही यावेळी गांधी म्हणाले.
Why is there an Indian flag there??? This is one fight we definitely don’t need to participate in… pic.twitter.com/1dP2KtgHvf
— Varun Gandhi (@varungandhi80) January 7, 2021
दरम्यान, अमेरिकी काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर मावळते राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरम भूमिका घेत समर्थकांवर संतापले आहेत तर ‘अमेरिका हे नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचं राष्ट्र असायला हवं,’ अस त्यांनी म्हटल.
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण पुजाऱ्यांच्या विवाहासाठी ‘या’ राज्यात ‘ब्राह्मण मॅरेज स्किम’
-
रणजितसिंह डिसलेंना जाहीर झाला आणखी एक मानाचा पुरस्कार
- डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची चर्चा
- अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल माघारी; टीम इंडियाला सलग दुसरा धक्का
- नोरा फतेहीला करायचे तैमूरशी लग्न, करीना म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
