🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार विनायक मेटे यांच्यात आरक्षणाबाबत अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढय़ासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
यावेळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह मराठा समाजाचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
EWS (आर्थिकदृष्ट्या मागास) संदर्भात केंद्र सरकारने २३ डिसेंबरला जीआर काढला होता, त्यातील काही त्रुटी या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या. यामुळे नवा अध्यादेश काढला जाईल, तोपर्यंत हे आरक्षण लागू राहील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती मेटे यांनी दिली.
मराठा समाजाच्या उमेदवारांनी यापूर्वी एमपीएससी नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. रखडलेल्या नियुक्त्या त्वरित केल्या जाव्यात अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली, याबाबत आगामी आठवड्यात निर्णय होईल असं मेटे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींची अर्थशास्त्रज्ञांसोबत बैठक
- औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – रामदास आठवले
- भाजपला शिवसेनेचा जोरदार दणका; दोन मातब्बर नेते बांधणार शिवबंधन
- ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील अक्षय कुमारचा किलर लुक व्हायरल
- राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी; शिवसेनेच्या माजी खासदाराची घणाघाती टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
