Share

‘सहज, सुव्यवस्थित आणि अखंडपणे सत्तेचं हस्तांतरण करणार’; हिंसाचारानंतर ट्रम्प नरमले

Published On: 

🕒 1 min read

वाशिंग्टन: नोव्हेंबर महिन्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुका पार पडल्या तर आता विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संपून २० जानेवारीला डेमोक्रेटिक पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे सत्ता सूत्र हाती घेतील या पार्श्वभूमीवर अमेरिकन काँग्रेसने निकालावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अमेरिकेची कॅपिटॉलमध्ये (संसद भवन) ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार घडवून आणला. यामध्ये लोकशाहीला काळिमा फासणारा अभूतपूर्व असा संघर्ष झाला. याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला तर डोनाल्ड ट्म्प यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर त्यांचे सोशल अकाउंट ब्लॉक करण्यात आले तर ट्म्प यांच्या वर महाभियोग आणण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली. आल्या नंतर ट्म्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘प्रत्येक अमेरिकन नागरिकाप्रमाणे मी देखील हिंसाचार आणि अराजकता माजवल्यामुळे संतापलो आहे. त्यामुळे संसद भवन सुरक्षित करण्यासाठी आणि धुडगूस घालणाऱ्यांना हटवण्यासाठी मी तातडीने नॅशनल गार्ड आणि फेडरल लॉ इनफोर्समेंटला पाचारणं केलं. अमेरिका हे नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचं राष्ट्र असायला हवं,’ असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे बोलताना म्हटलं.

दरम्यान, आता अमेरिकन काँग्रेसने निकालावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे २० जानेवारी रोजी नवं प्रशासनाचं उद्घाटन होईल. आता सहज, सुव्यवस्थित आणि अखंडपणे सत्तेचं हस्तांतरण करण्यावर माझं लक्ष असेल, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!