Share

औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – रामदास आठवले

Published On: 

मुंबई  – औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृती च्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असून आमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही.त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये.असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार ने औरंगाबद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव संमत केल्याची माहिती पुढे आल्या नंतर ना रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाचा छत्रपती संभाजी महराजांच्या नावाला विरोध नाही मात्र औरंगाबाद मध्ये बौद्ध संस्कृती च्या जागतिक स्तरावर नावलौकिक असणाऱ्या अजंठा आणि एलोरा या लेणी आहेत.जगभरातून अजंठा एलोरा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक औरंगाबादला येतात.

आठ जागतिक आश्चर्यांपैकी एक असणारे अजंठा एलोरा लेणी चे नाव औरंगाबाद ला विमानतळाला द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. शांतता अहिंसा प्रज्ञा शील करुणा सत्य या बौद्ध संस्कृती च्या तत्वांचा प्रतीक अजंठा एलोरा हे जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या बौद्ध लेणींचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!