🕒 1 min read
मुंबई : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.
सय्यद यांच्या अर्जाची दखल घेऊन कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल केल्या नंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल होते. मात्र, वैयक्तिक कारणास्तव ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती. यानंतर पोलिसांनी तिला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती.
आणि त्यात तिला 23 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं. मात्र, तिसऱ्या नोटिशीला तिने प्रतिसाद दिला नव्हता. उलट तिने हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टाने तिला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज (शुक्रवार) कंगनाला वांद्रे पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी हजर राहवे लागणार आहे. मात्र, कंगनाची फक्त दोन तासच चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर
- राज्यात कोरोना लसींच्या ड्राय रनचा आज दुसरा टप्पा
- ३ दिवसांत आयटीआर भरा, नाहीतर दुप्पट दंड भरा !
- आमचं ठरलंय : मुंबई महापालिका एकत्रच लढायची; राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा ?
- #JEE_2021 : जेईई ऍडवान्सड परीक्षा ३ जुलैपासून; तर विद्यार्थ्यांना ‘हा’ मोठा दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
